पालिका आता बैठका, संमेलने, परिसंवादासाठी जागा देणार भाड्याने, पवईतील एमसीएमसीआर केंद्राचा होणार वापर

मुंबई महापालिकेच्या पवई येथील महापालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्रात (एमसीएमसीआर) आता शैक्षणिक, संविधानिक, संचालक मंडळ बैठक, संमेलने आणि परिसंवादांचे आयोजन करण्यासाठी जागा भाडय़ाने उपलब्ध होणार आहे. केंद्राची सात मजली इमारत असून त्यात सर्वोतोपरी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या पवई येथील एमसीएमसीआर या प्रशिक्षण केंद्रामध्ये पालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱयांना प्रशिक्षण दिले जाते. केंद्रामध्ये पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांना काwशल्य आणि क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण केंद्र विविध सोयीसुविधांनी युक्त असून सामान्य नागरिकांनाही या प्रशिक्षण केंद्राचा उपयोग व्हावा यासाठी या केंद्राची जागा भाडय़ाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निसर्गरम्य आणि अत्यंत प्रशस्त अशा या केंद्रात खासगी बैठका आणि परिसंवादांचे आयोजन करण्यासाठी ttps://mcmcr.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून नागरिकांना जागा भाडेतत्त्वावर घेता येणार आहे.
या आहेत सुविधा
प्रशिक्षण केंद्रात प्रशस्त अशा 27 खोल्या आहेत. यात मीटिंग रूम, बोर्ड रूम, संगणक प्रशिक्षण केंद्र, वर्ग खोल्या, सेमिनार हॉल, अनौपचारिक प्रशिक्षण केंद्र, ऑडिटोरियम रूम, प्रदर्शन हॉल, दोनशे वाहने उभी राहतील एवढे प्रशस्त असे वाहनतळ, दृश्राव्य सादरीकरणासाठी प्रोजेक्टर अशा सुविधा उपलब्ध आहे.
Comments are closed.