BMC to take strict action against engineers in wake of rising pollution in Mumbai rrp
मुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. मात्र त्यामध्ये काही हलगर्जीपणा केल्यास संबंधित साहाय्यक अभियंता यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये काही नियम जुनेच आहेत. मात्र काही नियम कडक, कठोर केले आहेत. धूळ प्रदूषण नियंत्रण नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. त्यासंबंधित अहवाल दर आठवड्याला प्रमुख अभियंता आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) यांना सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये काही हलगर्जीपणा केल्यास संबंधित साहाय्यक अभियंता यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. (BMC to take strict action against engineers in wake of rising pollution in Mumbai)
दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण पसरले आहे. त्यानंतर मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात इमारत बांधकामे, विकास प्रकल्प आणि इतर माध्यमातून हवेत धूळ, धूर पसरून प्रदूषणात भर पडत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त यांनी आदेश देत नियमावली जारी केली होती. तसेच, आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. त्यामुळे धुळीचे प्रदूषण नियंत्रणात होते. मात्र आता पावसाळा संपला आहे. पुन्हा एकदा धुळीचे प्रदूषण वाढीस लागले आहे. हवेत प्रदूषण जाणवते आहे. त्याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने अगोदरपासून लागू प्रदूषण नियमावलीत आणखीन काही कडक नियमांची भर घालत सुधारित नियमावली जारी केली आहे. त्यामुळे आता शेकोटी पेटविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Vadapav Price Hike : गरिबांचा घास महागणार; बेकरी चालकांमुळे वडापावची किंमत वाढण्याची शक्यता
तसेच, इमारत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चुली पेटविण्यास बंदी आहे. बेकरीमध्ये लाकडी फर्निचर जाळण्यास मनाई करण्यात आली आहे. बेकरीमध्ये इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करावा. धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी सातत्याने पाण्याची फवारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेने सर्व विभागात सक्त निर्देश देत प्रदूषण रोखण्यासाठी जाहीर केलेल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होते की नाही, यावर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहे. मात्र नियम मोडणार्यांवर कडक कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
– Advertisement –
अशी आहे नियमावली
- बांधकामे, रस्ते कंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी धूळ नियंत्रण यंत्रणा सक्षम ठेवावी
- उघड्या वाहनातून डेब्रीजची वाहतूक करू नये
- नागरिकांनी ‘डेब्रीज ऑन कॉल’ योजनेचा वापर करावा
- रस्त्यांची स्वच्छता करताना धूळ उडू नये यासाठी अत्याधुनिक पद्धत वापरावी
- रस्त्यांवरील धूळ, डेब्रीज, कचरा नियमित उचलण्याची कार्यवाही करावी
- आवश्यक त्या ठिकाणी रस्ते पाण्याने धुवावेत
- धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी स्प्रिंक्लरचा वापर करावा
- कुठेही उघड्यावर कचरा जाळू नये
हेही वाचा – Passing Policy : 5 वी आणि 8 वीत नापास झालात तर…; केंद्रीय शिक्षण विभागाने बदलले नियम
Comments are closed.