Bangladesh Election 2026 – बीएनपी बहुमताच्या जवळ, १२० जागा जिंकल्या; जमात आघाडीला ३८ जागा, बहुमतासाठी १५० जागा आवश्यक
बांगलादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल समोर येत असून, राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा पक्ष बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) विजयाच्या उंबरठ्यावर असून त्यांनी आतापर्यंत पक्षाने २९९ पैकी १२० जागांवर विजय मिळवला आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या जमात-ए-इस्लामी आघाडीने ३८ जागा जिंकल्या आहेत. बांगलादेशात सत्ता स्थापनेसाठी १५० जागांच्या बहुमताची आवश्यकता असून, बीएनपी आणि मित्रपक्ष मिळून हा आकडा सहज पार करतील असे चित्र दिसत आहे.
तारिक रहमान यांच्याकडे नेतृत्वाची धुरा?
खालिदा झिया यांचे चिरंजीव आणि बीएनपीचे कार्यवाह अध्यक्ष तारिक रहमान हे सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, पक्षाच्या या मोठ्या विजयानंतर ते लवकरच मायदेशी परतण्याची शक्यता असून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आणि देश सोडून गेल्यानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी तारिक रहमान सज्ज झाले आहेत.
Comments are closed.