'साई' वसतिगृहात दोन मुलींचे मृतदेह सापडले.

कोल्लम: केरळच्या कोल्लममध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) हॉस्टेलमध्ये दोन युवा प्रशिक्षणार्थी मुलींचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आले आहेत. ही घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आल्यावर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्वरित तपास सुरू केला असला तरीही आतापर्यंत मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट झालेले नाही. कोझिकोड जिल्ह्यातील सँड्रा (17 वर्षे) आणि तिरुअनंतपुरम येथील वैष्णवी (15 वर्षे) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. दोघी साईच्या हॉस्टेलमध्ये राहून क्रीडा प्रशिक्षण मिळवत होत्या आणि स्वत:चे शिक्षणही जारी ठेवून होत्या. सँड्रा अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घेत होती आणि इयत्ता 12 वीची विद्यार्थिनी होती. तर वैष्णवी ही कब•ाrपटू होती आणि इयत्ता 10 वीत शिकत होती. दोघींचे मृतदेह बंद खोलीत पंख्याला लटकलेल्या स्थितीत मिळाले आहेत. संबंधित ठिकाणी कुठलीच सुसाइड नोट हस्तगत झालेली नाही. पोलीस आता याप्रकरणी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या अन्य मुली, त्यांचे प्रशिक्षक आणि दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांकडून माहिती मिळवत आहेत.

Comments are closed.