गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

भिवंडी येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी आलेले तीन पर्यटक समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. यातील दोघांना वेळीच वाचवण्यात यश आले आहे. तिसरा तरूण अमोल गोविंद ठाकरे (वय २५) या तरुणाचा मात्र बुडून मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी एमटीडीसीजवळील किनाऱ्यावर सापडला.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी आलेल्या एका गटातील तीन पर्यटक समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. यातील दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तिसरा तरूण अमोल गोविंद ठाकरे (वय २५) या तरुणाचा मात्र बुडून मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला आहे.
भिवंडी येथील काही मित्र शनिवारी गणपतीपुळे येथे आले होते. त्यांनी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मंदिरानजीकच्या समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिघेजण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. किनाऱ्यावर असलेल्या लोकांनी तत्काळ मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर, तेथील जीवरक्षक त्वरित मदतीला धावले. त्यांनी जेटस्की बोटीच्या साहाय्याने बुडणाऱ्या तिघांपैकी दोघांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. मात्र, दुर्दैवाने या प्रयत्नात अमोल गोविंद ठाकरे या तरुणाचा जीव वाचवण्यात अपयश आले आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत होता. अखेर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला आहे.

Comments are closed.