लातूर जिल्हा हादरला! सुटकेसमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील चाकूर तालुक्यातील मौजे शेळगाव ते चाकूर रोडवरील तीरु नदीच्या पुलाखाली एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रूप करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता ही घटना उघडकीस आहे. चाकुर तालुक्यातील शेळगाव- चाकुर रोडवरील तीरू नदीच्या पुलाखाली एक सुटकेस तेथे मासेमारी करणाऱ्या मुलांना सापडली. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलीस पाटलांना त्याची माहिती दिली. यानंतर तपासणी केली असता त्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि पंचनामा करण्यात आला.
मयत महिलेची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रूप करण्यात आला होता. यादरम्यान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करत आहेत.
Comments are closed.