Bollywood actors Kapil Sharma, Rajpal Yadav, Remo D’Souza And Sugandha Mishra Receive Threat Mails


मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच बॉलीवूडमधील कलाकारांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक घटना समोर आली आहे. हिंदीमधील विनोदी कलाकार कपिल शर्मा तसेच राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुगंधा मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कपिल शर्माला आलेल्या ईमेलमध्ये त्याच्या कुटुंबालाही धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ईमेलमुळे एकाच खळबळ माजली आहे. धमकीचा ईमेल आल्यानंतर तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून पोलीस याबाबत आणखी तपास करत आहेत. (Bollywood actors Kapil Sharma, Rajpal Yadav, Remo D’Souza And Sugandha Mishra Receive Threat Mails)

हेही वाचा : Saif Ali Khan : सैफ हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; मोहम्मद शहजाद अन् सीसीटीव्हीतील आरोपीचा चेहरा जुळेना 

समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेता कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसुझा यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एक ईमेल आला आहे. धमकी देणाऱ्याने कपिल शर्माला त्याच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना तसेच नजीकच्या व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी मिळताच अंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा धमकी देणारा ईमेल पाकिस्तानमधून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या ईमेलमध्ये शेवटी BISHNU असे लोहिले असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

धमकीच्या पत्रात लिहिले आहे की, “आम्ही तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. हा प्रसिद्धीचा स्टंट नाही. आम्ही केलेला हा मेसेच तुम्ही गांभीर्याने घ्याल, अशी आशा आहे. जर असे केले नाही तर याचे परिणाम गंभीर होतील. याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावरही होऊ शकतो. आम्हाला पुढच्या 8 तासांत तुमच्याकडून त्वरित प्रतिसादाची अपेक्षा आहे. जर आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर आम्ही असं गृहीत धरू की, तुम्ही हे प्रकरण गांभीर्यानं घेत नाही आहात आणि आवश्यक ती कारवाई करू.” असे म्हणत या कलाकारांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात आंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएसच्या कलम 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : Saif Ali Khan : डिस्चार्ज मिळताच सैफने घेतली भजन सिंगची भेट, म्हणाला – 



Source link

Comments are closed.