सोनाक्षी साऊथ इंडस्ट्रीजवर फिदा

दाक्षिणात्य अभिनेता सुधीर बाबू आणि बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आगामी ‘जटाधरा’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. तेलुगु इंडस्ट्रीजमध्ये सोनाक्षीचा हा पहिलाच चित्रपट आहे. सोनाक्षीने साऊथ आणि बॉलीवूड इंडस्ट्रीजमधील कामाच्या पद्धतीनवर भाष्य केले आहे. साऊथ इंडस्ट्री आणि बॉलीवूड इंडस्ट्रीजमध्ये काम करताना जास्त फरक जाणवत नाही. परंतु, साऊथची टायमिंग खूप भारी आहे. ते लोक केवळ काही तासांसाठी काम करतात. तेथील वर्क-लाइफ बॅलन्स चांगला आहे. बॉलीवूडवाल्यांनी तो नक्कीच शिकायला हवाय.

साऊथमध्ये जर 9 वाजता शूटिंग सुरू केली असेल तर ते 6 वाजेनंतर कोणतेही शूट करत नाहीत. म्हणजेच त्यांना तशी परवानगीच नाहीय, असे सोनाक्षी म्हणाली. मी याआधी तामील चित्रपट ‘लिंगा’मध्ये काम केले होते. आता हा तेलुगु चित्रपट करत आहे. यासारखे चित्रपट करताना मला भाषेची अडचण आली नाही. मला वेगवेगळ्या भाषेतील अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. परंतु, मी हिंदी चित्रपटसृष्टीत व्यस्त असते, असे सोनाक्षी म्हणाली.

Comments are closed.