बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाला कर्नाटकात विरोध, मैसूर साबणाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी कन्नडीच हवा

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची मैसूर सँडल साबणाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून कर्नाटक सरकारने नियुक्ती केली. ही निवड होताच कर्नाटकवासीय चांगलेच चिडले आहेत. हिंदी अभिनेत्रीऐवजी एखाद्या कानडी अभिनेत्रीची निवड का केली नाही, असा सवाल करत आहेत.

तमन्नाची कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेडची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हण्नू 6.2 कोटींना नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कर्नाटकच्या जनतेला खटकली आहे. यावर आता कर्नाटक सरकारला सावरासावर करावी लागत आहे. उद्योगमंत्री एम. बी. पाटील म्हणाले, मैसूर सँडल साबण हा कर्नाटकातील उत्तम ब्रँड आहे.

साबणाचे लक्ष्य कर्नाटकाबाहेरील बाजारपेठेत प्रवेश करणे आहे. रश्मिका मंदाना, पूजा हेगडे, कियारा अडवाणी, दीपिका पदुकोण यांचाही विचार करण्यात आला होता. तमन्नाची मार्केटिंग पोहोच व फॅन फॉलोअर्स अशा अनेक बाबींचा विचार करून तिची निवड झाली. दरम्यान, बंगळुरूमध्ये एसबीआय बँकेच्या मॅनेजरने कन्नड बोलण्यास नकार दिल्याने या महिलेची कर्नाटक सरकारने नुकतीच बदली केली होती. यावर भाषावादाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

Comments are closed.