23 तारखेला ‘धडकन’ पुन्हा मोठ्या पडद्यावर

जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. अभिनेता सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘धडकन’ 23 मे रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 11 ऑगस्ट 2000 रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आला होता. अंजली (शिल्पा), देव (सुनील) आणि राम (अक्षय) यांच्या अप्रतिम अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली होती. ‘प्रतिष्ठत बॉलीवूड चित्रपट’ आणि विशेष स्क्रीनिंग उपक्रमाचा भाग म्हणून ‘धडकन’ पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
Comments are closed.