बॉलिवूडच्या भाईजानचा चाहत्यांसाठी खास सल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सलमान खान या वीकेंडला त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर सुट्टीचा आनंद घेत आहे. वीकेंडलाच त्याने एक्स वर पोस्ट करत त्याच्या चाहत्यांना एक अनोखा सल्ला दिला आहे. पनवेलच्या फार्म हाऊस येथून सलमानने काही फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना काही महत्त्वाचे सांगितले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फोटोंसोबत लिहिले, “विचार असा आहे की कोणत्याही क्षेत्रात, विचार करा, समजून घ्या, स्पष्ट व्हा, निर्णय घ्या आणि सर्व काही विसरून पुढे जा. आणि त्या टोपीवरुन मला आठवलं, टोपी स्वतःच घाला, कोणालाही घालू नका आणि दुसऱ्या कोणालाही तुम्हाला घालू देऊ नका.”

सलमान खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फोटोंसोबत लिहिले, “विचार असा आहे की कोणत्याही क्षेत्रात, विचार करा, समजून घ्या, स्पष्ट व्हा, निर्णय घ्या आणि सर्व काही विसरून पुढे जा… आणि टोपीवरून आठवलं, टोपी स्वतःच घाला, कोणालाही घालू नका आणि दुसऱ्या कोणालाही तुम्हाला घालू देऊ नका.” सलमान खानच्या या सल्ल्यावर चाहतेही प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. एका चाहत्याने सलमानच्या या सल्ल्यावर खाली प्रतिक्रिया म्हणून लिहीले की, “तुमच्यापेक्षा चांगली हॅट कोणीही घालू शकत नाही. सल्ल्याबद्दल धन्यवाद, भावा.” दुसऱ्या एकाने लिहिले, “सलमान भाई, मला म्हातारपणाची जाणीव होत आहे.”

सलमान खान सध्या दिल राजूच्या चित्रपटावर काम करत आहे. त्याचबरोबर त्याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचे नाव आता ‘मातृभूमी’ असे ठेवण्यात आले आहे. सलमानने रात्री एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये आपला बॉलिवूडचा भाईजान त्याच्या पाळीव कुत्र्याला मिठी मारताना दिसत आहे. त्याने या फोटोवर ‘हाच तर आनंद आहे’ अशी कॅप्शन दिली आहे.

Comments are closed.