अहमदाबाद विमानतळावर बॉम्बचा धोका
अहमदाबाद:
गुजरातमध्ये अहमदाबाद विमानतळावर बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी मिळाली. गुजरात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला अहमदाबाद विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. यानंतर बॉम्बविरोधी पथक, अग्निशमन दल आणि पोलिसांनी विमानतळावर तपासणी केली. या तपासणीत काहीच संशयास्पद आढळून आले नसल्याचे संयुक्त पोलीस आयुक्त शरद सिंघल यांनी सांगितले आहे.
Comments are closed.