इंडिगो विमानात २४ तासांत दुसऱ्यांदा बॉम्बची धमकी, लिपस्टिकने लिहिलेल्या चिठ्ठीमुळे खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आसाममधील दिब्रुगड येथून कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने शनिवारी खळबळ उडाली. विशेष म्हणजे इंडिगोच्या विमानाला गेल्या २४ तासांत मिळालेली ही दुसरी धमकी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील वॉशरूममध्ये एका नोटवर लिपस्टिकने बॉम्ब असल्याचा संदेश लिहिला होता. विमानातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने वैमानिकाला कळवण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विमानाचे कोलकाता विमानतळावर तातडीने सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

विमान लँड झाल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि बॉम्ब शोधक पथकाने विमानाची कसून तपासणी सुरू केली. सुदैवाने, प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे समजते. दरम्यान, अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विमानतळ पोलीस आणि सायबर सेल सतर्क झाले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Comments are closed.