दिल्लीतील 4 न्यायालये, 2 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत पुन्हा एकदा शाळा आणि न्यायालयांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. साकेत न्यायालय, पतियाळा हाउस, तीस हजारी आणि रोहिणी न्यायालयासमेत सीआरपीएफच्या दोन शाळांना बॉम्बची धमकी मिळाली. धमकीचा ईमेल जैश-ए-मोहम्मदच्या नावाने प्राप्त झाला होता. दोन्ही शाळांमध्ये सखोल तपासणी केली असता काहीच संशयास्पद आढळून आले नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर न्यायालयांच्या परिसरातही काहीच संशयास्पद आढळून आलेले नाही. यामुळे ही धमकी खोटी असल्याचे उघड झाले आहे.
Comments are closed.