जालंधर आणि फरीदकोटमधील शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी

मुख्यमंत्री मान यांचा धमकीच्या ईमेलमध्ये उल्लेख

वृत्तसंस्था/  जालंधर

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे गुरुवारी जालंधर आणि फरीदकोट दौऱ्यावर असताना दोन्ही जिल्ह्यांच्या शाळांना बॉम्बची धमकी मिळाली धमकीच्या ईमेलमध्ये मुख्यमंत्री मान आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना कार बॉम्बने उडविण्यात येणार असल्याचे नमूद आहे. जालंधरमध्ये बीएसएफ चौकानजीक दुचाकीत झालेल्या स्फोटानंतर आता खासगी शाळांना मिळालेल्या धमक्यांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. एपीजे स्कूलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यावर व्यवस्थापनाने त्वरित खबरदारीदाखल सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठविले. तसेच पोलीस पथकाने तेथे धाव घेत तपासणी केली आहे.

फरीदकोटमध्येही तीन शिक्षण संस्थांना बॉम्बची धमकी मिळाली. ईमेलद्वारे सादिक येथील शासकीय कन्या शाळा, फरीदकोट येथील दशमेश पब्लिक स्कूल आणि दशमेश डेंटल कॉलेजला ही धमकी मिळाली. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी संबंधित संस्थांना रिकामी करवत शोधमोहीम सुरु केली, ज्यात काहीच संशयास्पद आढळून आले नाही.

Comments are closed.