Border Gavaskar Trophy 2024 – विराट कोहलीला ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची संधी, कराव्या लागणार ‘इतक्या’ धावा
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली. तिसरा सामना पावसाच्या लपंडावामुळे अनिर्णित सुटला. त्यामुळे चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील अशेल. तसेच या सामन्यात विराट कोहलीला वेस्ट इंडिजा माजी खेळाडू ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची सूवर्ण संधी आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या होत्या. हा सामना टीम इंडियाने 295 धावांनी जिंकला होता. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली चांगली फलंदाजी करेल, अशी चाहत्यांसह संघाला अपेक्षा होती. परंतु दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली सपशेल अपयशी ठरला. चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीकडून संघाला चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे. कारण हा सामना मालिकेत आघाडी घेण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
विराट कोहली सध्या फॉर्मात नसला तरी त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला अनेक वेळा एकहाती विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून सर्वांनाच मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. तसेच त्याला ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची सुद्धा या सामन्यात संधी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराटने आतापर्यंत 7500 धावा केल्या आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट सहव्या क्रमांकावर आहे. ब्रायन लाराने आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 7535 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटला ब्रायन लाराचा विक्रम मोडण्यासाठी फक्त 36 धावांची आवश्यकता आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या (13,492 धावा) नावावर आहे. तसेच या यादिमध्ये दुसऱ्या क्रमांकावर महेला जयवर्धने (9509 धावा), जॅक कॅलिस (9033 धावा), जो रूट (7745 धावा) आणि पाचव्या क्रमांकावर ब्रायन लारा (7500 धावा) यांचा समावेश आहे.
Comments are closed.