गेल्या 15 वर्षांत फक्त 3 कर्णधारांनी बॉक्सिंग डे कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले; विराट कोहलीही यादीत
शनिवारी (27 डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सनी हरवून इतिहास रचला. इंग्लंडसाठी हा विजय खरोखरच संस्मरणीय आहे, कारण संघाने 15 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी सामना जिंकला. इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयासह, कर्णधार बेन स्टोक्सने एक विशेष टप्पा गाठला. तो आता विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. गेल्या 15 वर्षांत बॉक्सिंग डे टेस्टमध्ये फक्त तीन कर्णधारांनी ऑस्ट्रेलियाला हरवले आहे. यामध्ये विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि बेन स्टोक्स यांचा समावेश आहे.
2018 मध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, भारताने ऑस्ट्रेलियाला 137 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 2010 मध्ये मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटी गमावली होती, जेव्हा इंग्लंडने त्यांना एक डाव आणि 157 धावांनी पराभूत केले होते.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बॉक्सिंग डे कसोटी जिंकल्यानंतर आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्राॅफी जिंकल्यानंतर, भारतीय संघ 2020 मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. नियमित कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या कसोटीनंतर संघाचा भाग नव्हता आणि अजिंक्य रहाणेने सूत्रे हाती घेतली. रहाणेच्या नेतृत्वाखाली, भारताने 26 ते 30 डिसेंबर 2020 दरम्यान खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीच्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखून पराभूत करून पुन्हा एकदा इतिहास रचला.
2020 नंतर, ऑस्ट्रेलिया सलग बॉक्सिंग डे कसोटी जिंकत होता, ही मालिका बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने खंडित केली. 26 ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान खेळवण्यात येणारा अॅशेस मालिकेतील हा बॉक्सिंग डे कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला आणि इंग्लंडने 4 विकेट्सने विजय मिळवला.
गेल्या 15 वर्षांत बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला हरवणारे कर्णधार
विराट कोहली (भारत) – 2018
अजिंक्य रहाणे (भारत) – २०२०
बेन स्टोक्स (इंग्लंड) – 2025
Comments are closed.