12 वर्षांचा संसार; सोशल मीडियावर झालं दुसऱ्यासोबत प्रेम; इग्नोर केल्यानं प्रियकरानं घरी येऊन ति

जळगाव: जळगावमधील चोपडा येथे प्रेमप्रकरणातून प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या डोक्यात गोळी झाडत स्वतःलाही संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही थरारक घटना तालुक्यातील एका गावात प्रेयसीच्याच (Jalgaon Crime News) घरात काल (शनिवारी, ता २८) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेल्या या प्रेमकथेचा काल (शनिवारी, ता २८) रक्तरंजित शेवट झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.(Jalgaon Crime News)

देवानंद सुभाष धनगर (३५, भामपूर, ता. शिरपूर) असे मृत प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवानंद व संबंधित महिलेची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून ओळख झाली होती आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून  ही महिला देवानंद पासून दूर राहत असल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. यामुळे देवानंदने शनिवारी तिच्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडली व त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चोपडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत मयत प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगी शाळेतून घरी आली अन् समोर दिसला आईचा मृतदेह

सकाळी साडेदहाच्या सुमारास महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर घरात आईचा मृतदेह पाहून तिने आरडाओरड केली. त्यानंतर शेजारी घटनास्थळी धावून आले व पोलिसांना माहिती देण्यात आली. महिलेच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. १२ वर्षांपूर्वी तिचा विवाह चोपडा तालुक्यातील एका गावातील तरूणाशी झाला होता. लग्नानंतर सगळं सुरळीत सुरु असताना तिची देवानंद याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेमप्रकरणातून खुनाची ही घटना घडली आहे. घटनास्थळावरून तसे पुरावे मिळाले आहेत. दोघांच्या मोबाइल आणि सोशल मीडिया चॅटवरून इतर तपास करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती चोपडा शहर पोलिस निरीक्षक, मधुकर साळवे, यांनी दिली आहे.(Jalgaon Crime News)

१२ वर्षे नवऱ्यासोबत आपल्या मुलांसोबत सुखाने संसार सुरू असतानाच, मात्र सोशल मीडियावर तिची ओळख देवानंद धनगर याच्याशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. तिने त्याला टाळायला सुरूवात केल्यानंतर त्याने पिस्तुलाने प्रेयसीला संपवले अन प्रेमकहाणीची शेवट झाला.(Jalgaon Crime News)

आणखी वाचा

Comments are closed.