BREAKING: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रातील 'या' 3 बँकांवर RBI ची कडक कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

बँकिंग न्यूज: RBI ने गेल्या काही महिन्यात देशातील अनेक बँकांवर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली असून काही बँकांचे परवानेही आरबीआयने रद्द केले आहेत.

यामध्ये महाराष्ट्रातील अनेक बँकांचाही समावेश आहे. मध्यवर्ती बँकेने आपल्या अधिकारक्षेत्राचा वापर करून अनेक बँकांवर कारवाई केली आहे. देशातील सर्व सहकारी, सरकारी आणि खाजगी बँकांवर RBI ची देखरेख आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवरही RBI कठोर कारवाई करते. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या विविध नियामक नियमांचे आणि तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बँकांना लाखो रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित बँक ग्राहकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. प्रत्यक्षात ही कारवाई गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच झाली आहे.

दरम्यान, आरबीआयने राज्यातील कोणत्या तीन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली असून या कारवाईचा ग्राहकांवर काय परिणाम होणार? या संदर्भात माहिती अपडेट थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

कोणत्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली

सातारा सहकारी बँक लिमिटेड, मुंबई – RBI ने या बँकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. “भांडवल पर्याप्तता – प्राथमिक (शहरी) सहकारी बँका (UCBs)” आणि “एकल आणि गट कर्जदार/पक्षांच्या एक्सपोजरवरील मर्यादा आणि प्राधान्य क्षेत्रातील कर्ज – UCBs च्या लक्ष्यात सुधारणा” संबंधी RBI निर्देशांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड – RBI ने या बँकेला 8 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 20 आणि कलम 56 अंतर्गत नियमांचे उल्लंघन केले आहे आणि “तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या” (KYC) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात अयशस्वी झाले आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड – या बँकेलाही अशाच प्रकारच्या उल्लंघनासाठी 1.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने आपल्या आदेशात नमूद केले आहे की या बँकेने देखील केवायसीशी संबंधित नियमांचे पूर्णपणे पालन केले नाही.

बँक ग्राहकांवर काय परिणाम होईल?

बँकांवर दंडात्मक कारवाई करताना, आरबीआयने या कारवाईचा ग्राहकांवर काय परिणाम झाला याची बरीच माहितीही दिली आहे. आरबीआयने स्पष्ट केले आहे की या दंडात्मक कृती केवळ नियामक अनुपालन त्रुटींवर आधारित आहेत.

बँकांनी केलेल्या व्यवहारांच्या वैधतेवर किंवा ग्राहकांसोबत केलेल्या करारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हेतू या कारवाईचा नाही. म्हणजेच या कारवाईचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

बँकांवरील दंडात्मक कारवाईचा ग्राहकांवर परिणाम होणार नाही. तसेच, दंडात्मक कारवाई अंतर्गत वसूल करावयाची रक्कम बँकेकडूनच वसूल केली जाईल, बँक ही रक्कम ग्राहकाकडून वसूल करू शकत नाही.

Comments are closed.