Breaking News – इराणचे नेते अली खामेनी वापरत असलेले विमान नष्ट केल्याचा इस्रायलचा दावा
इस्त्रायल डिफेन्स फोर्सेसने सोमवारी दावा केला की त्यांनी रात्री केलेल्या हल्ल्यात तेहरानमधील मेहराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे एक विमान नष्ट केले. हे विमान दिवंगत सर्वोच्च अली खामेनी वापरत असल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. लष्कराच्या म्हणण्यानुसार, हे विमान वरिष्ठ इराणी अधिकारी आणि लष्करी कमांडर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरत होते. तसेच मित्रदेशांशी समन्वय साधण्यासाठीही त्याचा वापर केला जात होता.
दरम्यान, या हल्ल्याच्या आधी चाबहार मुक्त व्यापार क्षेत्राजवळील लष्करी तळावर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी हल्ला केल्याची माहितीही समोर आली आहे, ज्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मेहराबाद विमानतळ हा तेहरानमधील सर्वात जुन्या विमानतळांपैकी एक आहे. सध्या तो प्रामुख्याने देशांतर्गत आणि प्रादेशिक उड्डाणांसाठी वापरला जातो. हा देशातील सर्वात व्यस्त नागरी देशांतर्गत विमानतळ असून, येथे इराणच्या हवाई दलाच्या ताफ्याचीही तैनाती आहे. त्यामुळे हा विमानतळ नागरी आणि लष्करी वापराचा दुहेरी स्वरूपाचा महत्त्वाचा केंद्र मानला जातो.
या घटनेमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.