ब्रेकिंग न्यूज: आर अश्विनची IPL मधून निवृत्तीची घोषणा
भारतीय फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने बुधवारी (27 ऑगस्ट) इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता तो विविध देशांमधील लीग स्पर्धांमध्ये खेळत क्रिकेटचा नवा अनुभव घेण्याच्या तयारीत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करताना त्याने म्हटले – “प्रत्येक शेवटाला नवी सुरुवात असते. माझा IPL प्रवास आज संपतोय, पण जगभरातील विविध लीगमध्ये खेळत क्रिकेटचा शोध घेण्याची माझी नवी सुरुवात आजपासून सुरू होते.” अश्विनने सर्व फ्रँचायझींप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
विशेष दिवस आणि म्हणून एक विशेष सुरुवात.
त्यांचे म्हणणे आहे की प्रत्येक शेवटची एक नवीन सुरुवात होईल, आयपीएल क्रिकेटपटू म्हणून माझा वेळ आज जवळ येईल, परंतु विविध लीगच्या आसपासच्या खेळाचा शोधकर्ता म्हणून माझा वेळ आज सुरू झाला आहे.
सर्व फ्रँचायझींचे आभार मानू इच्छितो…
– अश्विन 🇮🇳 (@अश्विनरवी 99) 27 ऑगस्ट, 2025
अश्विनने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जकडून केली होती. त्यानंतर तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता IPLलाही त्याने अलविदा केला आहे.
बातमी अपडेट होत आहे….
Comments are closed.