विभागीय ज्युदो स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचे उज्ज्वल यश

क्रीडा व युवक सेवा संचलनाय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली द्वारा आयोजित शांतीनिकेतन विद्यापीठ सांगली येथे 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या विभागीय ज्युदो स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
दरम्यान यावेळी झालेल्या विविध वयोगट आणि वजनी गट ज्यूदो स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगट व 44 किलो वजनी मुली गटामध्ये कृष्णाई नंदकिशोर रावराणे हिने कास्य पदक मिळविले असून, 60 किलो वजनी गटामध्ये आकाश अपन्ना गोंधळी याने कांस्य पदक मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थी आणि प्रशिक्षक ए.व्ही.पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन म.ज.सावंत, सेक्रेटरी चं.शा.लिंग्रस, खजिनदार वि.रा.तायशेटे शाळा समिती चेअरमन द.दि.पवार तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक पी.के.पारकर, पर्यवेक्षक व्ही.पी.राठोड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक-हार्दिक अभिनंदन केले.

Comments are closed.