हिंदुस्थानच्या महिला अन् पुरुष संघांना कांस्यपदक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आशिया चषक तिरंदाजी जागतिक क्रमवारी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हिंदुस्थानी तिरंदाजांनी बुधवारी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करत दोन कांस्यपदकांची कमाई केली. याशिवाय पुरुष रिकर्व आणि अंतिम फेरीतही धडक मारली आहे.

महिला कंपाऊंड संघाने मागील स्पर्धेत कांस्य जिंकले होते. मात्र, यावेळी अंतिम फेरीत प्रवेश करून पदकाचा रंग उंचावण्याची संधी निर्माण केली आहे. चिकिथा तानीपर्थी, राज कौर आणि तेजल साळवे या त्रिकुटाने यजमान थायलंडचा २२९-२२६ असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना तिसऱ्या मानांकित कझाकिस्तानशी होणार आहे.

आशिया चषक तिरंदाजी स्पर्धा

पुरुष कंपाऊंड गटाच्या पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवूनही हिंदुस्थानी संघाला विजेतेपद राखण्यात अपयश आले आणि त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रजत चौहान, ऋषभ यादव आणि उदय कम्बोज यांना उपांत्य फेरीत व्हिएतनामकडून २३३-२३४ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. कांस्यपदकाच्या लढतीत हिंदुस्थानने भूतानला २३४-२३२ असे हरविले.

रिकर्व गटात हिंदुस्थानी पुरुष संघाने फेरी गाठली. देवांग गुप्ता, सुखचैन सिंह आणि जुयेल सरकार यांनी एकही सेट न गमावता हा विजय मिळवला. महिला रिकर्व संघातील रूमा बिस्वास, कीर्ती, रिद्धी फोर यांनी मलेशियाला ५-१ने नमवित कांस्य जिंकले.

Comments are closed.