Buchi Babu Trophy – ऋतुराज गायकवाडची शतक ठोकत निवडकर्त्यांना चपराक, 20 वर्षांच्या अर्शिन कुलकर्णीचीही बॅट तळपली

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा आपलं नाण खणखणीत वाजवलं आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात त्याची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच त्याने आता बुची बाबू स्पर्धेत धमाकेदार शतक ठोकत निवडकर्त्यांना चपराक दिली आहे. त्याचबरोबर 20 वर्षीय अर्शिन कुलकर्णीनेही दमदार फलंदाजी करत शतक ठोकलं आहे.
IPL 2025 मध्ये दुखापतीमुळे ऋतुराज खेळू शकला नाही. त्यामुळे त्याचा पूर्ण हंगाम खराब गेला होता. बुची बाबू स्पर्धेतील पहिल्या सामन्यातही त्याची बॅट तळपली नाही. परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने जबरदस्त पुनरागमन केलं आहे. महाराष्ट्राकडून खेळताना हिमाचल प्रदेशविरुद्ध त्याने 144 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 133 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे त्याने एकाच षटकात 4 षटकार खेचून चाहत्यांचा आनंद द्विगुणीत केला. ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त 20 वर्षीय अर्शिन कुलकर्णीने सुद्धा जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केलं आहे. त्याने 138 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. तसेच 190 चेंडूंमध्ये 146 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त 20 वर्षीय अर्शिन कुलकर्णीने सुद्धा जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केलं आहे. त्याने 138 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. तसेच 190 चेंडूंमध्ये 146 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे दिवसाअखेर महाराष्ट्राने 9 गड्यांच्या मोबदल्यात 440 धावांपर्यंत मजल मारली आहे.
Comments are closed.