गुड न्यूज, सोन्याचे दर घसरणार, आर्थिक पाहणी अहवालातून मोठे संकेत, चांदीच्या दराचं काय होणार?

आर्थिक सर्वेक्षण 2025 नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत 2024-25 चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे. यामध्ये सोन्याच्या दरामध्ये (Gold Rate) घसरण होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. तर, चांदीचे दर वाढू शकतात असं देखील सांगितलं गेलं आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात 2025 मध्ये कमोडिटीच्या किमती 5.1 टक्क्यांनी तर 2026 मध्ये 1.7 टक्क्यांनी कमी होतील, असा अंदाज आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करणार आहेत.

सोन्याच्या दरात घसरण होण्याची आशा

आर्थिक पाहणीमध्ये सोन्याच्या दरात घसरणी होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आलीय. दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करणात आला आहे. लोखंड आणि तांब्याच्या दरात घसरण होईल, त्याचा देखील परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे.भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीत घसरण होण्याचा अंदाज व्यक्त होत असल्यानं देशांतर्गत महागाई दराच्या दृष्टीनं ही चांगली बाब आहे.

ऑक्टोबर 2024 च्या जागतिक बँकेच्या कमोडिटी बाजार अहवालाचा दाखला देत आर्थिक पाहणी अहवालात खनिज तेलाच्या दरात घसरणीचा अंदाज आहे. मात्र, त्याचवेळी प्राकृतिक गॅसच्या दरात वाढीचा अंदाज आहे.

भारतात सोन्याची आयात का वाढली?

जागतिक अस्थिरता, विदेशी चलनाच्या गंगाजळीतील चढ उतार वाढलेले आहेत. त्यामुळं 2024 मध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक वाढलेली आहे. सोनं दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे. केंद्रीय बँकंद्वारे सोने साठवण्याची भूमिका घेतली गेल्याचा देखील परिणाम आहे. जागतिक पातळीवर किंमतीमधील वाढ, सणांच्या काळातील सुरुवातीची खरेदी, सुरक्षित गुंतवणूक आणि संपत्तीच्या मागणीमुळं सोन्याच्या खरेदीत आणि आयातीत वाढ झाली आहे. भारत जगातील सोने आयात करणारा मोठा देश आहे.

विदेशी गंगाजळीतील चढ उतार

आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरतेमुळं विदेशी गंगाजळीच्या रचनेत चढ उतार पाहायला मिळतोय. केंद्रीय बँकांनी जोखीम कमी करण्यासाठी आपल्याकडील गंगाजळीचं समायोजन करात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागितक रिझर्व्ह यंत्रणेत बदल होत असल्याचं सांगितलंय, त्यामुळं डॉलरचं वर्चस्व कमी होत असून नव्या चलनांच्या वापराची भूमिका वाढत आहे, असं म्हटलं.

सोन्याच्या दरातील घसरणीच्या  अंदाजामुळं गुंतवणूकादारांच्यावर परिणाम होऊ शकतो.तर, चांदीच्या दरामध्ये वाढ होईल याला सराफ बाजारातून देखील  समर्थन मिळू शकतं. 2025-26 या आर्थिक वर्षात सोने चांदी खरेदी विक्री, या क्षेत्रातील विविध बाबींकडे सरकारचं लक्ष राहील असा अंदाज आहे.

इतर बातम्या :

Union Budget 2025 Live Updates : यंदाच्या अर्थसंकल्पात कोणाला दिलासा, अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून काय निघणार? वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर..

अधिक पाहा..

Comments are closed.