24 ते 26 मार्च दरम्यान दिल्ली येथे होणा .्या अर्थसंकल्प सत्र
सूचनांसाठी मेल आणि व्हॉट्सअॅप नंबर जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील नवनियुक्त सरकारने 24 ते 26 मार्चदरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची तयारी सुरू केली आहे. या कालावधीतच विधानसभेत 2025-26 साठी ‘विकसित दिल्ली’ अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. समाजातील विविध घटकांकडून आलेल्या सूचनांचा समावेश करून अर्थसंकल्प तयार केला जाईल. अर्थसंकल्पासाठी सामान्य लोकांकडून सूचना घेण्यासाठी सोमवारी दिल्ली सरकारने न्ग्क्sग्tdात्प्ग्ंल्dgाt-25@dात्प्ग्.gदन्.ग्ह हा एक वेबसाईट ईमेल आणि 9999962025 हा व्हॉट्सअॅप नंबर जारी केला. तसेच विविध महिला संघटनांकडून सूचना घेण्यासाठी 5 मार्च रोजी विधानसभेत बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्ली सरकारचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी या अर्थसंकल्पाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. याप्रसंगी दिल्लीतील कोणताही व्यक्ती लेखी स्वरूपात आपल्या सूचना पाठवू शकतो, असे सांगण्यात आले.
Comments are closed.