उत्तनमध्ये बिल्डिंगचा स्लॅब कोसळला; रहिवासी गंभीर जखमी

उत्तनमधील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून एक रहिवासी गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वखार सिद्दिकी (३१) असे जखमी रहिवाशाचे नाव असून त्याच्या डोक्यात पाच टाके पडले आहेत तर मणक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत ही अतिधोकादायक स्थितीत असल्याने महापालिकेने ही इमारत रिकामी करून सील केली आहे.

सागर दर्शन सोसायटी असे चार मजली दुर्घटनाग्रस्त इमारतीचे नाव असून या इमारतीत १० गाळे व २४ फ्लॅट एकूण १२५ रहिवासी वास्तव्यास होते. दरम्यान, शुक्रवारी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब दुसऱ्या मजल्यावरील वखार सिद्दिकी याच्या घरात कोसळला. या दुर्घटनेत वखार यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालि केचे सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन व त्यांच्या पथकाने ही इमारत रिकामी करून तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आदेश देत इमारत सील केली.

Comments are closed.