Buldhana hair loss icmr delhi chennai expert doctors team for research says prataprao jadhav


बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमधील लोक सध्या केस गळतीच्या समस्येला तोंड देत आहेत. हे प्रकरण आता इतके वाढले आहे की, यासाठी आता थेट बाहेरच्या राज्यांमधून वैद्यकीय पथके येणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. (buldhana hair loss icmr delhi chennai expert doctors team for research says prataprao jadhav)

दोन – चार दिवसांपासून बुलढाण्यातील शेगाव येथील लोकांना अचानक पडू लागलेले टक्कल हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजतो आहे. त्यामुळे या गावांमधील वातावरण संपूर्णपणे बदलून गेले आहे. पण, पाण्याचे नमुने तपासून किंवा आरोग्य अधिकाऱ्यांनी भेटी देऊनही येथील समस्येत फार काही फरक पडलेला नाही. किंबहुना, या आजाराचा विस्तार वाढतोच आहे. शनिवारी तर या आजाराने शेगाव तालुक्याच्या सीमा ओलांडत शेजारील नांदुरा तालुक्यात शिरकाव केला आहे.

– Advertisement –

हेही वाचा – S. Jaishankar : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीचे भारताला निमंत्रण; परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर राहणार उपस्थित

नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वाडी या गावात केसगळती आणि टक्कल पडलेले सात रुग्ण आढळून आले आहेत.

– Advertisement –

या केसगळतीचे कारण नेमके काय आहे, हे शोधण्यासाठी सोमवारी दिल्ली, चेन्नई येथून तज्ज्ञ डॉक्टरांची पथकं बोलावण्यात आली आहेत. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच आयसीएमआरचे शास्त्रज्ञ या केस गळती आजारावर संशोधन करीत आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरू नये, असं आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी केलं आहे.

प्रताप जाधव यांनी केस गळतीबाधित गावांना भेट दिली. असा आजार पहिल्यांदाच समोर आला असल्याने आजाराच्या मुळाशी जाऊन संशोधन करणे गरजे आहे, या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे उपाययोजना चालू आहेत. घरगुती तेल, साबण, शॅम्पू या उत्पादनांची तपासणी अन्न तसेच औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनीही ही उत्पादने मुदतबाह्य झाली नाहीत ना, याची तपासणी करावी, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

या आजारात सुरुवातीला लोकांना डोक्यात खाज येण्यास सुरुवात होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जवळपास सगळे केस गळतात आणि टक्कल पडते. केवळ पुरुषच नाही तर महिलांना देखील याचा त्रास झाला आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : राजा होणं म्हणजे…चाणक्यांची आठवण काढत काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस



Source link

Comments are closed.