पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, न्यायालयीन कोठडीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्याला
बुलढाणा वार्ता: चिखली शहरात नगर परिषद निवडणुकीत (Nagar Parishad Election) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या काँग्रेसच्या (Congress) युवा शहराध्यक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) उमेदवारी दाखल केल्याने शहरात खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 9 नोव्हेंबर रोजी चिखली शहरात चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या विशाल उर्फ रिकी काकडे (Vishal Kakade) याने त्याच्यावर त्याची पत्नी घेत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून व कौटुंबिक कलहातून पत्नी नमिता काकडे हिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी चिखली शहर पोलीस ठाण्यात विशाल काकडे विरुद्ध 09 नोव्हेंबर रोजी पत्नी नमिता काकडे तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विशाल काकडे हा अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे.
Buldhana News: कोठडीतूनच निवडणूक अर्ज दाखल
मात्र विशाल काकडे याने न्यायालयाच्या परवानगीने नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 13 अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विशाल काकडे याने न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस संरक्षणात येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Buldhana News: चिखली शहरात एकच खळबळ
कालपर्यंत चिखली शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा चिखली शहर युवा अध्यक्ष असलेल्या विशाल काकडेंना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर विशाल काकडे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चिखली शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका बाजूला गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेला व्यक्ती कोठडीत असतानाच त्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली कशी? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Maharashtra Local Body Elections Timetable : असे असेल निवडणुकीचे टाईमटेबल
नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.