बांगलादेशी घुसखोरांच्या अतिक्रमणावर 'बुलडोजर'

50 बुलडोझर, 36 डंपरचा वापर :  आलिशान फार्महाउस केले उद्ध्वस्त : हजारो बांगलादेशींना घेतले ताब्यात

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरातच्या अहमदाबाद येथील शाहआलम भागानजीक चंडोला तलाव क्षेत्रात मंगळवारपासून बांगलादेशी घुसखोरांच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर अॅक्शन सुरू झाली आहे. गुजरात पोलिसांनी सोमवारी  रात्रीपासूनच तयारी सुरू केली होती. येथे 50 बुलडोझर अणि 36 डंपरच्या मदतीने अतिक्रमण हटविण्यात येत आहे. आतापर्यंत 18 हजार चौरस फुटात फैलावलेल्या एका आलिशान फार्महाउसला हटविण्यात आले असून पोलीस, सायबर क्राइम आणि एसआरपीची पथके तैनात करण्यात आली आहेत. तर महापालिकेच्या या कारवाईच्या विरोधात स्थानिक लोकांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु उच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार देत याचिका फेटाळली आहे.

तलावक्षेत्रात अवैध बांधकाम करत लल्लू बिहारीने आलिशान फार्महाउस उभारले होते, या फार्महाउसमध्ये बांगलादेशी घुसखोरांना संरक्षण दिले जात होते. तीन दिवसांपूर्वीच येथून 1 हजारांहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले होते. आता या पूर्ण अवैध बांधकामाला हटविण्यात येत आहे. पोलिसांनी मागील दोन दिवसांत या भागातून 890 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पहलगाम हल्ल्यानंतर सुरू करण्यात आली. या घुसखोरांच्या चौकशीत अनेकांकडे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड सापडले आहे.

6500 बांगलादेशी घुसखोर ताब्यात

अहमदाबाद आणि सूरतमध्ये मोठ्या शोधमोहिमेनंतर पूर्ण राज्यात अशाप्रकारची मोहीम राबविण्यात आली, यात स्रुमारे 6500 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची ओळख पटविण्यात आली अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे. या बांगलादेशी घुसखोरांना बीएसएफ आणि केंद्र सरकारच्या मदतीने देशाबाहेर काढले जाणार आहे.

गुन्हेगारीचे केंद्र

अहमदाबाद येथे दाणीलीमडा मार्गावर असलेला चंदोला सरोवर आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्राला ‘मिनी बांगलादेश’ या  नावाने ओळखले जाते. हे क्षेत्र 1200  हेक्टरमध्ये फैलावलेले आहे. हा पूर्ण भाग गुन्हेगारी घटनांसाठी कुख्यात आहे. या बांगलादेशी घुसखोरांना लल्ला बिहारी नावाने गुडांनी आश्रय दिला होता. तो पैसे घेऊन बांगलादेशींना तेथे वास्तव्य करू देत होता. लल्ला बिहारी एका बांगलादेशी परिवाराला वसविण्यासाठी 10-12 लाख रुपये घेत होता. तसेच तो बांगलादेशींना बनावट दस्तऐवज देखील तयार करवून देत होता.

आलिशान फार्महाउस पाहून अधिकाऱ्यांना धक्का

संबंधित अतिक्रमणाच्या ठिकाणी लल्ला बिहारीचे आलिशान फार्महाउस होते. या फार्महाउसमधील दृश्य पाहून अधिकाऱ्यांनाच धक्का बसला. तर बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची मोहीम सुरु होण्यापूर्वीच तो फरार झाला होता. परंतु अहमदाबाद पोलिसांनी मंगळवारी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Comments are closed.