बुलेट्स लोकांना आजारी बनवतात

मुंग्या पृथ्वीवर आढळून येणाऱ्या छोट्या जीवांपैकी एक आहेत. परंतु अनेक प्रकरणांमध्ये त्यांची वैशिष्ट्यो माणसांपेक्षा अधिक विचित्र आहेत. अशाच एका प्रकारच्या मुंगीचा दंश सर्वात तीव्र असतो. या मुंगीच्या दंशामुळे माणूस आजारी पडू शकतो. या प्रकारच्या मुंग्या अनेक देशांमध्ये आढळून येतात.  या मुंग्यांनी चावा घेतल्यावर माणसाला बराच वेळ त्रास होत असतो. यावर अनेकदा डॉक्टरांकडून उपचारही करवून घ्यावे लागत असतात.

बुलेट प्रजातीच्या मुंग्यांना जगातील सर्वात मोठ्या मुंग्यांपैकी एक मानले जाते. त्यांचा आकार 0.7 ते 1.2 इंचापर्यंत असतो. बुलेट मुंगीच्या विषारी दंशामुळे माणसाला असह्dया वेदना होतात, त्यादरम्यान एखादी गोळी लागल्यासारखे संबंधित माणसाला वाटू लागते. या मुंगीला बुलेट नाव पडण्यामागे हे देखील एक कारण आहे.

या बुलेट मुंग्या पृथ्वीवरील अत्यंत थंड भाग वगळता जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आढळून येतात. लोकांच्या घरांमध्ये त्या दिसून येतात. सर्वसाधारणपणे मुंग्या या जमिनीवर वावरत असतात. परंतु बुलेट मुंग्या जमिनीवर नव्हे तर झाडावर राहतात. खासकरून वर्षावनांमधील झाडे असलेल्या भागांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक असते. या मुंग्या शांत प्रवृत्तीच्या असतात. या मुंग्यांचा विषारी दंश असूनही त्या अत्यंत आक्रमक प्रकारच्या मुंग्या नसतात.

Comments are closed.