कपिल देव यांना मागे टाकत बुमराहने रचला 'हा' विक्रम!

भारतीय संघ आशिया कप 2025 संपताच वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मालिकेत उतरला आहे. येथे टॉस गमावल्यामुळे टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागली. फायनल संपल्यानंतर फक्त 3 दिवसांनी जसप्रीत बुमराह अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायला परत आला आहे. तिथे पहिल्या डावात त्याने 3 विकेट घेतल्या. यासोबतच बुमराहने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. बुमराहने दिग्गज कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला आहे.(Bumrah has broken the great Kapil Dev’s big record)

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात जसजसा बुमराहने तिसरा बळी घेतला, तसतसे त्याच्या नावावर घरच्या मैदानावर टेस्ट क्रिकेटमधील 50 विकेट्स पूर्ण झाल्या. यासह तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय जमीवरती 50 टेस्ट विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी रविचंद्रन अश्विन (149 विकेट) आणि रवींद्र जडेजा (94 विकेट) यांनी हे विक्रम गाठले आहेत. मात्र हे दोघेही फिरकी गोलंदाज असल्यामुळे, बुमराह हा वेगवान गोलंदाजांमध्ये क्रमांक 1 ठरतो. बुमराहने घरच्या मैदानावर आतापर्यंत 13 टेस्ट सामने खेळले असून, 24 डावांत त्याने 50 विकेट्स घेण्याचे मोठे यश संपादन केले आहे.

बुमराहने घरच्या मैदानावरील आपल्या 24व्या डावात 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. या बाबतीत त्याने जवागळ श्रीनाथची बरोबरी केली आहे. दिग्गज कपिल देव यांनी हा टप्पा 25 डावांत गाठला होता, तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी हे यश 27व्या डावात मिळविले होते. मात्र टाकलेल्या चेंडूंच्या बाबतीत बुमराह नंबर 1 ठरतो. घरच्या मैदानावर टेस्ट क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेण्यासाठी बुमराहने फक्त 1747 चेंडू टाकले आहेत. 2018 साली टेस्ट पदार्पण केलेल्या बुमराहने आतापर्यंत 49 टेस्ट सामन्यांत एकूण 222 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत, ज्यामध्ये 15 वेळा त्याने 5 विकेट्सची कामगिरी केली आहे.

Comments are closed.