बुर्किना फासोचे अध्यक्ष इब्राहिम ट्राओर यांचा बाणा; 200 मशिदी बांधण्याची सौदीची ऑफर नाकारली, मूलभूत सुविधांसाठी केली सूचना

सध्या जागतिक वातावरण अस्थिर होत आहे. अनेक देशांत कट्टरतावादी प्रबळ होत आहेत. त्यामुळे धर्मांधता वाढत आहे. तसेच धर्माच्या नावाखाली समाजासमाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. जगात अशा घडामोडी घडत असताना बुर्किना फासोचे अध्यक्ष इब्राहिम ट्राओर यांनी आपला बाणा दाखवत विकासाचा दृष्टीकोन स्पष्ट केला आहे. इब्राहिम ट्राओर यांनी सौदी अरेबियाने त्यांच्या देशात 200 मशिदी बांधण्याची ऑफर नाकारली आहे. त्याऐवजी ट्राओर यांनी सौदी अरेबियाने शाळा, रुग्णालये किंवा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करावी असे सुचवले जे बुर्किना फासोच्या लोकांसाठी रोजगार निर्माण करतील, अशी सूचना केली आहे.

याबाबत ट्राओर म्हणाले की, बुर्किना फासोमध्ये आधीच अनेक रिकाम्या मशिदी आहेत आणि देशाला खरोखर विकास आणि प्रगतीची आवश्यकता आहे. आपल्या देशाने खूप नुकसान सहन केले आहे आणि आता या सर्व समस्यांवर मात करत स्वातंत्र्य परत मिळवण्याची आवश्यकता आहे. हा निर्णय बुर्किना फासोच्या विकासासाठी ट्राओरच्या दृष्टिकोन दर्शवतो. शिक्षण, आरोग्यसेवा आणि आर्थिक वाढीला प्राधान्य देतो. त्यांच्या नेतृत्वाखाली, देश शाश्वत विकास आणि समावेशक प्रशासनाकडे आपले लक्ष वळवत आहे.

Comments are closed.