बुर्किना फासोच्या अध्यक्षांनी 200 मशिदी बांधण्याची सौदीची ऑफर नाकारली, मूलभूत सुविधांसाठी केली सूचना; देशाच्या विकासाला दिले प्राधान्य

सध्या जगभरात वातावरण अस्थिर असून दोन समाजात तेढ निर्माण झाल्याने दंगलीच्या घटनाही घडत आहेत. अशा स्थितीत बुर्किना फासोचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम ट्राओर यांनी धार्मिक गोष्टींना प्राधान्य देण्यापेक्षा विकासाचा दृष्टीकोन दाखवून दिला आहे. ट्राओर यांनी त्यांच्या देशात 200 मशिदी बांधण्याची सौदी अरेबियाची ऑफर नाकारली असून त्यांनी मूलभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करावी अशी सूचना केली आहे.
अनेक देशांमध्ये कट्टरतावाद आणि धर्मांधता वाढत आहे. धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्या येत आहे, अशा स्थितीत ट्राओर यांनी जगाला नवा आदर्श घालून दिला आहे. सौदी अरेबियाने शाळा, रुग्णालये किंवा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करावी अशी सूचना ट्राओर यांनी केली असून त्यामाध्यमातून जनतेसाठी रोजगार निर्माण करण्याची विनंती केली आहे. देशात प्रचंड गरिबी असून शाळा, रुग्णालये उभारण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने मदत करण्याचे आवाहन इब्राहिम ट्राओर यांनी सौदी अरेबियाला केली.
देशाने खूप नुकसान सहन केले
देशात आधीच अनेक रिकाम्या मशिदी आहेत. तसेच देशाला विकास आणि प्रगतीची आवश्यकता आहे. आपल्या देशाने खूप नुकसान सहन केले असून या सर्व समस्यांवर मात करत प्रगतीकडे वाटचाल करण्याची आवश्यकता आहे, असे ट्राओर यांनी म्हटले आहे. देशात शिक्षण, आरोग्यसेवा आणि आर्थिक वाढीला प्राधान्य देऊन देश शाश्वत विकास आणि सर्वसमावेश प्रशासनाकडे आपले लक्ष वळवत असल्याचेच ट्राओर यांच्या निर्णयातून समोर आले आहे.
Comments are closed.