जैसलमेरमध्ये बस पकडली
10-12 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
वृत्तसंस्था/ जैसलमेर
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली आहे. जैसलमेर येथून जोधपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका बसला अचानक आग लागली, या घटनेत 3 मुले आणि 4 महिलांमसवेत कमीतकमी 10-12 जण गंभीर होरपळले गेले असून त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. थैयता गाव ओलांडताच बसच्या मागील हिस्स्यातून धूर येऊ लागला आणि काही क्षणांमध्ये पूर्ण बसला आगीने वेढल्याने प्रवाशांचा मदतीसाठी आक्रोश सुरू झाला. अनेक लोक खिडक्या आणि दरवाजांमधून कशाप्रकारे तरी बाहेर पडू शकले.
ग्रामस्थ आणि रस्त्यांवरून जाणाऱ्या लोकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले. त्यांनी आसपासच्या जलस्रोतांमधून पाणी आणि वाळूच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला, याचदरम्यान माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी पाहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुमारे एक तासाचा कालावधी लागला. बस पूर्णपणे जळून खाक झाली असून बसमध्ये जिवंत बाहेर काढता येईल असा एकही व्यक्ती मिळाला नाही. सुमारे 10-12 जण बसमध्येच होते असा अनुमान असल्याचे अग्निशमन अधिकारी पृथ्वीपाल सिंह राठौड यांनी सांगितले आहे. सर्व जखमींना स्थानिक लोक आणि पोलिसांच्या मदतीने रुग्णालयांमध्ये पोहोचविण्यात आले आहे. आग लागण्याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, परंतु प्रारंभिक तपासात शॉर्ट सर्किट किंवा इंजिन अधिक गरम झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करत तपास सुरू केला आहे.
Comments are closed.