टॅरिफचं संकट, जागतिक दबावामुळं रुपया घसरला, सहा महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला,जाणून घ्या

Rupee vs Dollar: भारतीय रुपया मंगळवारी सुरुवातीच्या कारभारात 29 पैशांनी घसरुन डॉलरच्या तुलनेत 87.95 रुपयांवर पोहोचला आहे. जो गेल्या सहा महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे. विदेशी चलन ट्रेडर्सच्या मते रुपयावरील दबाव आज देखील कायम राहील, अशी शक्यता आहे. अमेरिकेनं भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं भारतावर उच्च टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. त्याला भारतानं उत्तर देखील दिलं आहे.

आंतरबँक विदेशी चलन बाजारात अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया 87.95 वर खुला झाला आहे. जो सोमवारी 87.66 वर बंद झाला आहे. कालच्या तुलनेत आज 29 पैशांची घसरण झाली.

रुपयात का घसरण?

डॉलर निर्देशांक ,हा सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकेच्या डॉलरची स्थिती दाखवतो. तो 0.04 टक्क्यांनी वाढून 98.81 रुपयांवर पोहोचला आहे. देशांतर्गत बाजारात देखील कमजोरी पाहायला मिळते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्समध्ये सुरुवातीला 200.40 अंकांची घसरण होऊन ती 80818.32 अंकांवर आला. एनएसई निफ्टी 58.90 अंकांनी घसरुन 24663.80 अंकांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय ब्रेंट क्रूड 0.28 टक्के घसरुन 68.57 डॉलर प्रति बॅरल झाला आहे.

शेअर बाजारावर टॅरिफचा परिणाम

शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी जोरदार विक्री केली. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2566.51  कोटी रुपयांचे शेअर विकले होते. अमेरिकेच्या इशाऱ्यामुं शेअर बाजारात तणाव पाहायला मिळाली. अमेरिकेच्या प्रशासनानं भारतावर रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी करण्यामुळं आणि नफा कमावल्याचा आरोप केला आहे.

भारतानं अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भारताच्या विदेश मंत्रालयानं अमेरिका आणि यूरोपियन यूनियनला उत्तर दिलं होतं.विदेशी मंत्रालयानं म्हटलं की रशिया आणि यूक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियाकडून तेल खरेदी सुरु केल्यामुळं अमेरिका आणि यूरोपियन यूनियन भारताला चुकीच्या प्रकारात टार्गेट केलं जात आहे. विदेश मंत्रालयानं म्हटलं की भारतानं रशियाकडून तेलाची आयात सुरु केली कारण जे पारंपरिक पुरवठादार होते त्यांनी यूरोपला विक्री सुरु केली होती. अमेरिकेने भारताला जागतिक ऊर्जा बाजारात स्थिरता असावी यासाठी रशियाकडून तेल खरेदीला प्रोत्साहन दिलं होतं. भारताचा उद्देश नेहमी देशातील ग्राहकांना क्रूड ऑईल किफायतशीर दरात देण्याचा प्रयत्न आहे, असं सांगण्यात आलं.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.