पाच दिवसांमध्ये पाच आयपीओ खुले होणार, पैसे तयार ठेवा, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी

<एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई : भारतीय शेअर बाजारात आजपासून (3 फेब्रुवारी) सुरु होणाऱ्या आठवड्यात  5 आयपीओ  सबस्क्रीप्शनसाठी खुले होणार आहेत.  याच आठवड्यात दोन आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होतील. अर्थसंकल्पानंतर आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी खुले होत असल्यानं याला गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जानेवारी महिन्यात  27 आयपीओ आले होते. त्या आयपीओंच्या माध्यमातून  7354 कोटींची यशस्वीपणे उभारणी करण्यात आली होती.

चामुंडा इलेक्ट्रिकल्स

चामुंडा इलेक्ट्रिकल्स कंपनीचा एसएमई आयपीओ 4 फेब्रुवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 14.60 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. एका शेअरचा किंमतपट्टा  47 ते 50 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटमध्ये 3000 हजार शेअर असतील. यामध्ये किमान गुंतवणूक 1 लाख  41 हजार रुपये करावी लागेल. 6 फेब्रुवारीला हा आयपीओ क्लोज होईल.

केन इंटरप्रायझेस आयपीओ

भारतीय शेअर बाजारात केन एंटरप्रायझेसचा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी 5 फेब्रुवारीला खुला होईल. या आयपीओच्या माध्यमातून 83.65 कोटी रुपयांची उभारणी केली जाईल. एका लॉटमध्ये 1200  शेअर्स असतील. किंमतपट्टा 94 रुपये निश्चित करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत या आयपीओवर बोली लावता येईल. 

अमविल हेल्थकेअर आयपीओ

अमविल हेल्थकेअर कंपनीचा आयपीओ 5 ते  7 फेब्रुवारीदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहील. आयपीओच्या माध्यमातून 60 कोटी रुपयांची उभारणी केली जाईल. या द्वारे कंपनी  44.03 लाख शेअर जारी करेल. तर 10 लाख शेअर ऑफर फॉर सेल द्वारे विकणार आहे. 

रेडीमिक्स कन्स्ट्रक्शन मशिनरी आयपीओ

रेडीमिक्स कन्स्ट्रक्शन मशिनरी आयपीओच्या माध्यमातून  37.66 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 30.62 लाख शेअर जारी केले जाणार आहेत. कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा 121-123 रुपयांदरम्यान निश्चित केला आहे.  हा आयपीओ 6 फेब्रुवारी ते  10 फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. 

एलेगंझ इंटेरिअर्स

या कंपनीचा आयपीओ 7 फेब्रुवारीला सबस्क्रीप्शनसाठी खुला होईल. 11 फेब्रुवारीला बोली लावण्याची मुदत संपेल. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून 78.07 कोटी रुपयांच्या उभारणी पर्याय स्वीकारला आहे. कंपनी  60.05 लाख शेअर जारी करेल तर आयपीओचा किंमतपट्टा 123-130 रुपये आहे. 

या आठवड्यात  डॉ. अग्रवाल्स हेल्थकेअर हा मेनबोर्ड आणि मालपानी पाईप्स हा एसएमई आयपीओ 4 फेब्रुवारीला लिस्ट होऊ शकतो. 

इतर बातम्या :

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/business/budget/share-market-trend-will-set-on-three-points-fii-stand-third-quarters-results- आणि rbi-repo- दर-पॉलिसी -1342179">बजेट दिवशी थंड प्रतिसाद ,शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात तेजी की घसरण? कोणते घटक प्रभावी ठरणार?

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Comments are closed.