मोदी सरकारनं 6 वर्षात शेतकऱ्यांना दिले 3.68 लाख कोटी, किती शेतकऱ्यांना मिळाला ‘या’ योजनेचा लाभ?

मोदी सरकार: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी (Farmers) अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. यापैकी एक म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). ही योजना 2019 मध्ये सुरू झाली, तेव्हापासून कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांचे खात्यावर 6000 रुपयांची आर्थिक मदत पाठवली जाते. है पैसे तीन हप्त्यांच्या स्वरुपात शेतकऱ्यांना दिले जातात. आजच शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता मिळाला आहे. दरम्यान, आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून सरकारनं शेतकऱ्यांना किती पैसे दिले आहेत, याबाबतची माहिती तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 3.68 लाख कोटी रुपये मिळाले

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये सुरू झाली, तेव्हापासून कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये वर्ग केले जातात. जे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये येते. या योजनेचा लाभ पूर्वी फक्त 9.60 कोटी शेतकऱ्यांना मिळत होता, मात्र आता लाभार्थ्यांची संख्या 9.80 कोटी झाली आहे. 19 व्या हप्त्याने, आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 3.68 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे?

पीएम किसान सन्मान निधीचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. देशातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्याची आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचीही गरज आहे, जेणेकरून त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी वेळेवर मदत मिळू शकेल. यावेळी भागलपूर किसान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या वर्धापन दिनाचे साक्षीदार होते.

पीएम किसान निधीसाठी पात्रता काय?

पीएम किसान निधी योजनेची पात्रता अशी आहे की ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपर्यंत शेतीयोग्य जमीन आहे, जर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य शेतकरी असतील तर त्या सर्वांना वेगवेगळे फायदे मिळतील.

या योजनेचा लाभ कोणाला मिळत नाही?

जर तुमची जमीन कोणत्याही संस्थेच्या किंवा कंपनीच्या नावावर असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही. तुम्ही कोणत्याही संवैधानिक पदावर काम करत असाल, माजी कर्मचारी सरकारकडून 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेत असाल, तुम्ही आयकर भरला तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला पीएम किसान योजनेशी संबंधित काही समस्या असल्यास, तुम्ही pm kisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर देखील संपर्क साधू शकता. एवढेच नाही तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. इथेही तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

महत्वाच्या बातम्या:

PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 शेतकऱ्यांना मिळणार, खात्यात पैसे न आल्यास काय करावं?

अधिक पाहा..

Comments are closed.