आरबीआयची मोठी घोषणा, 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा आणणार, कारण..
नवी दिल्ली: भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य गव्हर्नर म्हणून सजय म्हलोत्रा यांनी कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्यापूर्वी शक्तिकांत दास हे हे मुख्य गव्हर्नर होते. आरबीआयनं 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा लवकरच जारी केल्या जाणार आहेत. मात्र, याच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार नव्या नोटांवर गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांची सही असेल. ही एक नियमित प्रक्रिया आहे, ज्यामध्ये नव्या गव्हर्नरची नियुक्ती झाल्यानंतर त्यांची सही असलेल्या नोटा जारी केल्या जातात.
जुन्या नोटांचं काय होणार?
आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार नव्या नोटांप्रमाणं जुन्या नोटा देखील वैध असतील. आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार या नोटा लवकरच बँका आणि एटीएममध्ये उपलब्ध असतील.
आरबीआयनं 2000 हजार रुपयांच्या नोा बंद केल्यानंतर बाजारातील रोकड वाढली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार मार्च 2017 मध्ये बाजारात 13.35 लाख कोटींची रोकड होती. तर, मार्च 2024 पर्यंत याची वाढ 35.15 लाख कोटी झाली आहे. मार्च 2020 पर्यंत यूपीआय व्यवहारांची संख्या 2.06 लाक कोटी होती. जी फेब्रुवारी 2024 पर्यंत 18.07 लाख कोटी झाली. 2024 चा विचार केला तर वर्षभरात डिजीटल व्यवहारांची संख्या 172 अब्ज इतकी होती.
रिपोर्टनुसार दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक रक्कम एटीएममधून काढली गेली. तर, सण आणि निवडणुकीच्या काळात रोख रकमेची मागणी वाढल्याचं दिसून आलं. ग्रामीण भागात डिजीटल पेमेंटची सेवा मर्यादित आहे. यामुळं लोक रोख रकमेचा वापर व्यवहारासाठी करतात.
दरम्यान शक्तिकांत दास यांच्या जागी मुख्य गव्हर्नर म्हणून निवड झाल्यानंतर संजय म्हलोत्रा यांनी पहिल्याच तिमाहीत रेपो रेट घटवला होता. शक्तिकांत दास यांची त्यानंतर पीएमओमध्ये नियुक्त करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटबंदी जाहीर केली होती. नोटबंदीवेळी त्यावेळी बाजारात असलेल्या 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी केंद्र सरकारनं 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्या होत्या. मात्र,त्यानंतर आरबीआयनं पुन्हा 2000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता संजय म्हलोत्रा हे गव्हर्नर झाल्यानं त्यांच्या सहीच्या नोटा छापल्या जाणार आहेत. हा नियमित प्रक्रियेचा भाग आहे.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.