Businessman Tushar Dhumal dies after a spinning swing breaks at Sayajiraje Water Park in Akluj, Solapur
सोलापूर जिल्ह्यातील सयाजीराजे वॉटर पार्क हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचे असलेल्या या वॉटर पार्कमध्ये आज (18 जून) एक दुर्दैवी घटना घडली आहे. फिरता पाळण्याचा एक भाग तुटून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत.
Sayajiraje Water Park Accident : सोलापूर : उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या असून राज्यातील सर्व शाळा दोन दिवसांपूर्वीच सुरू झाल्या आहेत. मात्र अद्यापही काही जण पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सयाजीराजे वॉटर पार्क हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचे असलेल्या या वॉटर पार्कमध्ये आज (18 जून) एक दुर्दैवी घटना घडली आहे. फिरता पाळण्याचा एक भाग तुटून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वेगाने पाळणा फिरत असताना सदर घटना घडली आहे. अचानक फिरत्या पाळण्याचा एक भाग तुटला आणि त्यामध्ये बसलेले तिघेजण जमीनीवर जोरात आदळले. या अपघातात भिगवण येथील एलआयसी उद्योजक तुषार धुमाळ हे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने अकलूज येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या व्यक्तीच्या मानेला फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय तिसऱ्या व्यक्तीला किरकोळ मार लागला आहे. मात्र घडलेल्या घटनेमुळे तिसरा व्यक्ती मानसिक धक्क्यात आहे.
हेही वाचा – Jayant Patil : पक्षांतरासाठीच भेटलो असेल…; भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
आजच्या दुर्घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून हा अपघात झाल्यानंतर पाळणा तातडीने थांबवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अपघातानंतर पाळण्याच्या शेजारी असलेल्या लोक घाबरले आहे. पाळण्याचा एक भाग तुटल्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी तातडीने जखमींकडे धाव घेतली. तसेच अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी तत्काळ हजर झाले. घटना नेमकी कशी घडली, याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी वॉटरपार्कमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. तसेच अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, सदर अपघाताच्या घटनेनंतर वॉटर पार्कमधील सुरक्षा यंत्रणा आणि देखभाल व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. ही दुर्घटना टाळता आली असती, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. तसेच प्रशासनाकडून आणि संबंधित यंत्रणांकडून याप्रकरणाची चौकशी होण्याची मागणी होत आहे. जेणेकरून भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये. कारण पाळण्यासारख्या साहसी राइड्समध्ये योग्य तपासणी आणि देखरेख होणे गरजेचे असते. मात्र या दोन्ही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास होणाऱ्या अपघातांमध्ये निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतो, हे आजच्या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे.
हेही वाचा – Devendra Fadnavis : वेगवेगळ्या पक्षात न्याय मिळत नसलेल्यांना सोबत घेऊन…; काय म्हणाले फडणवीस?
Comments are closed.