T20WC2026: सेमीफायनल आणि फायनलच्या तिकिटांची विक्री सुरू! ICC च्या गोंधळामुळे नवा वाद

टी-20 विश्वचषक 2026 आता सुपर-8 टप्प्यात पोहोचला असून दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान, आयसीसीने (ICC) सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यांसाठी तिकीट बुकिंग देखील सुरू केली आहे. स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये तिकीट खरेदीची मोठी ओढ दिसून येत आहे. मात्र, याच काळात एक मोठा वाद निर्माण झाला असून आयसीसीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सेमीफायनलचा सामना भारतात होणार की श्रीलंकेत, हे अद्याप निश्चित झालेले नाही. जोपर्यंत पाकिस्तानचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत सेमीफायनल नेमकी कुठे होणार, याचे चित्र स्पष्ट होऊ शकणार नाही.
पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळत आहे, परंतु जर पाकिस्तानचा संघ पात्र (Qualify) ठरू शकला नाही, तर दोन्ही सेमीफायनल सामने भारतातच खेळवले जातील.
Comments are closed.