वसई विरारमध्ये ठाकूर बंधूंनी भाजपला अस्मान दाखवलं, ठाकरेंचा शिलेदार भेटीसाठी पोहोचला

विरार  : बहुजन विकास आघाडीनं वसई विरार महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. या यशानंतर उद्धव ठाकरे यांचे शिलेदार आमदार मिलिंद नार्वेकर यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे मोठे बंधू भाई ठाकूर यांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या.वसई विरार महापालिकेत भाजपला अस्मान दाखविणाऱ्या बहुजन विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर यांची उद्धव ठाकरे यांच्या शिलेदार मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतली. तसेच ठाकूर यांच्या पक्षाच्या कामगिरीविषयी त्यांनी ठाकूर यांचे कौतुक केले. वसई विरार महापालिकेत भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडी असा थेट संघर्ष होता.

भाजपाने वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी सर्व शक्तीपणाला लावली होती. परंतु हितेंद्र ठाकूर यांनी घवघवीत यश मिळवत पुन्हा एकदा वसई विरार महापालिकेवरती बहुजन विकास आघाडीचा झेंडा रोवला. बहुजन विकास आघाडीने 115 जागांपैकी 71 जागांवर विजय मिळविला. तर याच महापालिकेत भाजपला 43 जागा जिंकता आल्या. त्यांच्या या कामगिरीविषयी आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

महापालिकेत यशस्वी कामगिरी करत हितेंद्र ठाकूर यांनी महापालिकेत सत्ता मिळविली आहे.ठाकूर यांच्या यशाबद्दल नार्वेकर यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या कुटुंबाला आणि बहुजन विकास आघाडीच्या पदादिकाऱ्यांन शुभेच्छा दिल्या. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले तसेच बहुजन विकास आघाडीला शुभेच्छा दिल्या.

बविआची वसई विरारवर एकहाती सत्ता

वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या निकालात बहुजन विकास आघाडीने (बविआ) दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण 115 जागांपैकी 71 जागांवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून, भाजपाने 43 जागा, तर शिवसेना (शिंदे गट)  एका जागेवर विजयी झाला आहे. उर्वरित पक्षांना एकही जागा मिळालेली नाही.

आणखी वाचा

Comments are closed.