विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांना चिकन मसाला वाटप, भाविकांमधून तीव्र नाराजी; मंदिर समितीकडून बिव्हिजी कंपनीला नोटीस

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकांना ठेकेदार बीव्हिजी कंपनीकडून दिवाळी सणानिमित्त गिफ्ट म्हणून विविध पदार्थ देण्यात आले आहेत. यामध्ये चिकन मसाला पॅकेटही देण्यात आली आहेत. देवाच्या दारात अक्षेपार्ह पॅकेट वाटप करण्यात अल्यामूळे भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून बीव्हिजी कंपनीला नोटीस देण्यात आली आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पावित्र्य जपण्याचे काम मंदिर समिती करत आहे. मात्र, मंदिर समितीचे खासगी सुरक्षा रक्षक पुरवण्याचे तात्पुरते काम हे बिव्हिजी कंपनीला देण्यात आलेले आहे. या कंपनीकडून नेमण्यात आलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांना दिवाळी निमित्ति कंपनीकडून विविध पदार्थांचे गिफ्ट देण्यात आले आहे. यामध्ये चिकन मसाला असा उल्लेख असलेले पाकिट देखील देण्यात आले आहे. त्यामुळे बिव्हीजी कंपनीकडून मुद्दामहून भाविकांना त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे का? असा प्रश्न देखील भाविकांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.कारण या अगोदरही बिव्हिजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकांकडून आषाढी यात्रेत दर्शन रांगेतील भाविकांना बेदम मारहाण केल्याचे प्रकार घडलेले आहेत.असे असताना पुन्हे मंदिराचे व भाविकांचे पावित्र्य धुळीस मिळवण्याचा प्रकार सुरु झाला आहे. यामुळे सर्व भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मंदिर समितीकडून बिव्हिजीला नोटीस
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सुरक्षेसाठीचा ठेका बिव्हिजी या कंपनीला तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेला आहे. या कंपनीकडून खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना बिव्हिजी कपनीचे विविध उत्तपादने दिवाळीनिमित्त भेट देण्यात आली आहेत. यामध्ये चिकन मसाला पॅकेटही देण्यात आले आहे. चिकन मसाले पॅकेटचे वाटप करणे हे मंदिराचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टिने आक्षेपार्ह आहे. त्यामुळे या घटनेबाबत कंपनीला मंदिर समितीकडून नोटीस बजावण्यात आली आहे.निश्चितीच त्यावर कारवाई करण्यात येईल. – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
चिकन मसाला वाटप करणे ही चुकीचे
बिव्हिजी कंपनीने कर्मचाऱ्यांना चिकन मसाला वाटप करणे ही चुकीची घटना आहे.मात्र, एक आहे की कुठलाही मसाला हा मांसाहारी नसतो. तो शाकाहारीचे असतो. मात्र, ते चुकीचेच आहे. याबाबत बिव्हजी कंपनी व मंदिर समितीने काळजी घेतली पाहिजे.-जयकुमार गोरे, पालकमंत्री
बिव्हिजी कपंनीकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून कंपनी निर्मित विविध पदार्थ मिळून गिफ्ट देण्यात आले आहे. यात चिकन मसाला पॅकेट देण्यात आले आहे. मात्र, हे मसाला पॅकेट हे मांसाहरी नाही. तरी देखील भाविकांच्या भावना लक्षात घेवून वाटप थांबवले आहे. -कैलास देशमुख,
समन्वयक, बिव्हिजी कंपनी
Comments are closed.