बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब
बायपास सर्जरी महात्मा फुले योजना: राज्यातील रुग्णालयांमध्ये अनेकांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा व्यवस्थितपणे लाभ मिळत नसल्याचा मुद्दा सोमवारी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी लोणीकर यांनी शिवसेनेचे आमदार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांना जाब विचारला. आमच्या मतदारसंघातील एका व्यक्तीला बायपासच्या शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले योजना (Mahatma Phule aarogya yojana) आणि आयुषमान भारत योजनेचा (Ayushman Bharat Scheme) लाभ मिळत नाही. योजनेच्या निकषापेक्षा त्या व्यक्तीला कमी पैसे मिळत असल्याची तक्रार बबनराव लोणीकर यांनी केली. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मला महात्मा फुले आरोग्य योजनेच्या निकषांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांचे नाव सांगावे. मी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करतो, असे आश्वासन दिले. (Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026)
आमदार बबनराव लोणीकर यांनी सभागृहात हा मुद्दा जोरकसपणे लावून धरला. मंत्री महोदय आपल्या विभागाचे काम चांगले होत आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री महोदयांनी या देशातील राज्यातील आणि देशातील 100 कोटी लोकांसाठी आयुषमान भारत योजना आणली आहे. राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना आणली आहे. या दोन्ही योजना एकत्र आहेत. आमचे विठ्ठल कदम नावाचे शेतकरी आहेत. त्यांची बायपास शस्त्रक्रिया करायी आहे. या शस्त्रक्रियेसाठी एका व्यक्तीला 11 लाख रुपये लागतात. सहा लाख रुपये केंद्र आणि राज्य सरकारकडून बायपासच्या शस्त्रक्रियेसाठी दिले जातात. पण त्यांना फक्त 1 लाख रुपये मिळत आहेत. बायपासला एक लाख रुपयात होत नाही, दोन महिन्यांपासून ऑपरेशन थांबले आहे. त्याच्यामुळे केंद्राचे 3 लाख आणि राज्याचे 3 लाख असतानाही फक्त विठ्ठल कदम यांना एक लाख रुपये मंजूर करु, असे सांगितले आहे. त्यामुळे सहा लाख रुपये या लाभार्थ्यांना देणार का, असा प्रश्न बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले की, अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य लोणीकर साहेबांनी जो प्रश्न विचारला, आमच्या योजनांमध्ये एक लाख रुपयांची गरज नाही. आमच्या योजनेत बायपास आणि अन्य शस्त्रक्रियांचे निकष स्पष्ट आहेत. आम्ही आयुषमान भारत जेव्हा आमच्याबरोबर जोडली तेव्हा आमच्या चार्जेसमध्ये वाढ झाली. त्यामुळे कुठल्याही रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी एक रुपयाही देण्याची गरज नाही. त्यामुळे असं कुठलं हॉस्पिटल करत असेल तर सांगा. आपण प्राथमिक आरोग्य केंद्रापासून, ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालयात आपण ही योजना प्रभावीपणे आपापल्या मतदारसंघात प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.