विहिरीत पडलेल्या वासराला जीवदान; शिवसेनेच्या तत्परतेनंतर नगरपरिषदेचे बचाव कार्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी शहरातील नवलाई नगर येथे विहिरीत पडलेल्या वासराला रत्नागिरी नगरपरिषदेच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वासराला जीवदान मिळाले.

चिपळूण-मधील-खोल-विहिरीतून-वासराची सुटका-शिवसेना-उबर-आणि-महानगरपालिका-संयुक्त ऑपरेशन (1)

नवलाई नगर येथील खोतांच्या विहिरीत वासरू पडल्याची माहिती शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांना फोन वरून मिळाली. त्यांनी तात्काळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर नगरपरिषदेचे आपत्तकालीन पथक घटनास्थळी पोहोचले. ४० फूट खोल अरुंद विहिरीभोवती झाडेझुडपे वाढली होती. विहिरीत अंधार होता. इतक्यात शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शाखाप्रमुख सिद्धेश्वर कोळी, राजू सुर्वे आणि सर्फराज शेख हे घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्यात सहभागी झाले. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांने विहिरीत उतरून वासराच्या पायाला दोर बांधला. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने वासराला बाहेर काढले. विहिरीतून बाहेर येताच ते थेट त्यांच्या आईच्या कुशीत धावले आणि माय-लेकरांची भेट झाली.

Comments are closed.