कृष्णाला 'बटर चोर' म्हणणे आक्षेपार्ह आहे
वृत्तसंस्था / भोपाळ
भगवान श्रीकृष्ण हे साऱ्या भारतासाठी देव असून त्यांचा उल्लेख ‘माखनचोर’ असा करणे आयोग्य आहे, असा आक्षेप मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केला आहे. या राज्यातील एका ‘जन्माष्टमी’ कार्यक्रमात भाग घेताना त्यांनी हे त्यांचा आक्षेप व्यक्त केला. प्रत्यक्ष भगवंतांना ‘चोर’ हे विषेशण लावणे भाविकांच्या मनाला न पटणारे आहे. भगवंतांच्या संदर्भात या शब्दाचा उच्चारही करु नये, असे प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात केले. या त्यांच्या विधानावर आता उलटसुलट प्रतिक्रिया येत असून त्याला राजकीय रंगही प्राप्त झाला आहे.
भगवान श्रीकृष्ण माखनचोर नव्हते. गोकुळातील नागरीकांनी कष्ट करुन उत्पादित केलेल्या लोण्यावर राजा कंस हा त्याचा अधिकार गाजवत होता. हे लोणी तो मटकावित होता. याचा राग भगवान श्रीकृष्णांना होता. त्यामुळे त्यांनी हे लोणी गोकुळातील लोकांनाच मिळावे अशी व्यवस्था केली होती. त्यामुळे ते ‘माखनचोर’ म्हणून प्रसिद्ध झाले, अशा अर्थाचे प्रतिपादन मोहन यादव यांनी केले. तथापि, यादव भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ते इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत, असा आरोप मध्यप्रदेशातील विरोधी पक्षनेते उमंग सिंघर यांनी केला आहे. तथापि, मोहन यादव यांनी केलेल्या विधानाच्या समर्थनार्थही अनेक जण पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे.
Comments are closed.