105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर, सुप्रिया सुळे संतापल्या

105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वाक्व्यावर सांगतो व्यक्त केला आहे. X वर एक पोस्ट करत त्या असं म्हणाल्या आहेत.

X वर पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.”

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच भिकारी म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री फडणवीस विनंती करतो की, विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या.”

Comments are closed.