Asia Cup: विजेता संघाशिवाय कोणी ट्रॉफी ठेवू शकतो का? जाणून घ्या संपूर्ण नियम
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले, पण अजूनही भारतीय संघाला ट्रॉफी मिळालेली नाही. टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर आशियाई क्रिकेट कौन्सिल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. कारण मोहसिन नकवी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्रीदेखील आहेत आणि त्यामुळेच भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, टीम इंडिया नकवी व्यतिरिक्त इतर कुणाकडूनही ट्रॉफी घ्यायला तयार होती, पण नकवी यांनी ते होऊ दिले नाही.
त्यांनी नीचपणाची सगळी मर्यादा ओलांडत ट्रॉफी स्वतःबरोबर हॉटेलमध्ये नेली. आता मोठा प्रश्न असा आहे की टीम इंडियाला ट्रॉफी नेमकी केव्हा मिळणार? आणि विजेत्या संघाव्यतिरिक्त कुणी ट्रॉफी स्वतःकडे ठेवू शकतो का? याबाबतच्या नियमांमध्ये नेमके काय म्हटले आहे,जाणून घेऊया.
क्रिकेटमध्ये असा कोणताही नियम नाही की स्पर्धेतील विजेता संघाव्यतिरिक्त कोणी ट्रॉफी स्वतःजवळ ठेवू शकतो. एखाद्या संघाने विशिष्ट व्यक्तीकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिल्यास त्याबाबत स्पष्ट नियम नाहीत. नियमांनुसार अंतिम सामना जिंकल्यानंतर ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जाते. काही काळ ती ट्रॉफी चॅम्पियन संघाकडे राहते आणि नंतर त्यांना ट्रॉफीची प्रत दिली जाते.
पण येथे टीम इंडियाला अजिबात ट्रॉफी मिळालीच नाही, कारण मोहसिन नकवी यांनी कोणालाही ट्रॉफी स्वीकारू दिली नाही. उलट त्यांनी नीचपणा दाखवत ट्रॉफी आणि पदकं स्वतःबरोबर हॉटेलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. यावरून आता बीसीसीआयनेही मोहसिन नकवी यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
मोहसिन नकवी यांच्याकडे या गोष्टीचे कोणतेही उत्तर नसेल की त्यांनी नियम मोडून ट्रॉफी स्वतःजवळ का ठेवली? त्यांना वाटले असते तर इतर कुठल्या सदस्याच्या हातून भारतीय संघाला ट्रॉफी देऊ शकले असते. या प्रकरणावरून आता बीसीसीआयही आयसीसीकडे मोहसिन नकवी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करू शकते. बीसीसीआयचे सचिन देवजीत सैकिया यांनीही स्पष्ट केलं आहे की नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी बैठकीत ते या प्रकरणाचा तीव्र विरोध करणार आहेत.
टीम इंडियाने चॅम्पियन बनल्यानंतर मोहसिन नकवी ट्रॉफी देण्यासाठी पोडियमवर आले होते. नकवी बराच वेळ पोडियमवर टीम इंडियाची वाट पाहत होते, पण भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारली नाही. त्यानंतर टीम इंडियाने ट्रॉफी न घेता पोडियमवर चढून विजयाचा जलसा साजरा केला.
Comments are closed.