लॉरेन्स बिष्णोई गँग दहशतवाद्यांच्या यादीत, कॅनडा सरकारची घोषणा

हिंदुस्थानसह इतर काही देशांत धुमाकूळ घालणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगला कॅनडा सरकारने दहशतवाद्यांच्या यादीत टाकले आहे. कॅनडामध्ये भीती आणि दहशतवादाचे वातावरण निर्माण केल्याचे कारण देत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
बिष्णोई गँग कॅनडात सक्रिय आहे. विशेषकरून परदेशी नागरिकांची लक्षणीय संख्या असलेल्या भागांमध्ये या टोळीकडून कारवाया केल्या जातात. विशिष्ट समाजाच्या लोकांना या टोळीकडून लक्ष्य केले जाते. खून, खंडणी, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि धमक्या अशी गुन्हेगारी कृत्ये या टोळीचे लोक करतात. त्यामुळे कॅनडाच्या गृहमंत्रालयाने या गँगला दहशतवादी घोषित केले आहे. त्यामुळे आता कॅनडा सरकार व सुरक्षा यंत्रणांना दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत या गँगवर कारवाई करता येणार आहे.
Comments are closed.