ई-चलन भरण्यासाठी उमेदवारांची लगबग

ठाणे महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता जमेदवारी अर्ज भरताना वाहनांवरील ई-चलन दंड थकीत असू नये असा नियम आहे. ई-चलन दंड थकीत असेल तर उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे पेंडिंग ई- चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात उमेदवारांची लगबग सुरूच आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर उसेच भिवंडी हदीत आतापर्यंत ३१० उमेदवारांनी थकीत ई-चालन भरले असून तब्बल एकूण ११ लाख ५० हजार ५५० इतका दंड जमा केला आहे. यात ठाणे १०४, उल्हासनगर ८. भिवंडी – ११७ आणि केडीएमसी क्षेत्रातील ८९ उमेदवारांनी थकीत ई-चलन भरले आहेत.

Comments are closed.